...अखेर मनोहर भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

Update: 2020-02-08 06:27 GMT

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मनोहर भिडे यांच्या विरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. 2018 मध्ये आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांच्या विरोधात बेळगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात झालेल्या सर्व सुनवाईला भिडे गैरहजर राहिले. त्यामुळं न्यायालायने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी ही 24 मार्च रोजी होणार आहे.

एप्रिल 2018 मध्ये येळ्ळूर गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं विधान केलं होते. या विधानामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळं आता पुढील होणाऱ्या सुनावणीत भिडेंना उपस्थित राहणं गरजेचं आहे. यासंदर्भात टीव्ही 9 मराठी ने वृत्त दिले आहे.

Similar News