आता सैन्याला अधिकार...

Update: 2020-06-21 11:39 GMT

चीनने पुन्हा एकदा सीमेवर काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तातडीने सडेतोड उत्तर देण्याचे अधिकार केंद्र सरकारने आता सैन्याला दिले आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सं

रक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सीडीएस आणि तिन्ही सैन्यदलांचा प्रमुखांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर सैन्याला हे अधिकार देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. लडाखसह इतर ठिकाणी सीमेवर चीनच्या सैन्याने काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तातडीने उत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर भारताच्या सर्व सीमा, आकाश आणि समुद्रातल्या चीनच्या हालचालींवरही बारीक लक्ष ठेवण्याचे आदेशही सैन्याला देण्यात आलेले आहेत, असंही या वृत्तात सांगितले आहे. त्याचबरोबर भविष्यात चीनच्या सीमेवर भारताने आता वेगळी रणनीती आखण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Similar News