पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटीच्या मदतीसाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता

महापूराने बाधित झालेल्यांसाठी राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींच्या मदतीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Update: 2021-08-03 09:51 GMT

 राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानीबाबत सादरीकरण केले. दरम्यान पूरग्रस्तांसाठी ही मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान तातडीची मदत म्हणून जी मदत देण्यात येणार आहे ती थेट पूरग्रस्तांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या महापूरामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली आहे. कोकणाला या महापूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. व्यवसायिकांना देखील या महापूराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दुकानदारांना 50 हजार तर टपरी धारकांना 10 हजार मदत देखील देण्यात येणार असल्याची माहिती देण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांसाठी अकरा हजार कोटी 500 कोटींचं पॅकेज एसडीआरएफ चे 10 हजार, दुकानदार 50 हजार टपरी धारक 10 हजार, पूर्ण घर पडले अशा व्यक्तींसाठी 1 लाख 50 हजार, अर्धवट घर पडलेल्यांना 50 हजार, 25 टक्के घर पडले तर 25 हजारांची मदत दिली जाणार आहे, सोबतच मत्स व्यवसायासाठीही मदत केली जाणार आहे, वीज, रस्ते, नाले, शाळांचं नुकसान आहे त्यासाठी देखील  पॅकेजमधून मदत केली जाणार आहे. दरम्यान शेती नुकसानीची ऐंशी ट्क्के पाहाणी झाली आहे असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पॅकेजची अमंलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहेत. या महापूरात २ लाख  कुटंबांना फटका बसला आहे तर १६ हजार  व्यापारी दुकानदारांना याचा फटका बसला आहे.

Tags:    

Similar News