अपर्णा रामतीर्थकर यांचं निधन

Update: 2020-04-28 08:07 GMT

पुरुषसत्ताक संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या वादग्रस्त अपर्णा रामतीर्थकर यांचं आज (28 एप्रिल) सोलापूर इथं निधन झालं. त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सोलापुर येथे अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी सोलापुर इथं पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणी करण्यात मोलाचा सहभाग नोंदवला होता.

अपर्णा रामतीर्थकर त्यांच्या विवादास्पद वक्तव्याने चर्चेत राहायच्या. मुलींना फार स्वातंत्र्य नको असा प्रचार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर यांना पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.

Similar News