पुणे नवले ब्रीज परीसरात पुन्हा अपघात, १० ते १२ गाड्या एकमेकांना धडकल्या

Update: 2024-02-24 07:42 GMT

पुणे : एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने इतर वाहनांना पाठीमागून धडक दिल्यामुळे विचित्र अपघात पुण्याच्या नवले ब्रीज परीसरात घडला आहे. या वाहन धडकीमध्यें १०  ते १२ वाहने ही एकमेकांना  धडकल्या आहेत. यात काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुणे कात्रज वरून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलला हा अपघात झाला. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक समोर असणाऱ्या वाहनाला जोरात धडक बसल्या मुळे गाड्या एकमेकांवर आदळल्या. नवले पूल परिसरामध्ये वारंवार अपघाताच्या घटना या होत असतात. गेल्या काही महिन्याभरात आणि मागील काही वर्षात या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. अपघात झालेल्या वाहनांना बाजूला काढत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News