आम्फन महाचक्रीवादळाचा वेग वाढला, या राज्यांना धोका

Update: 2020-05-20 01:52 GMT

कोरोनाचा कहर सुरू असताना बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या आम्फन महाचक्रीवादळाचा फटका ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची भीती आहे. या वादळाचा वेग वाढला असून ओडिशामधील भद्रकमध्ये वादळाआधी जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. या वादळाचा फटका तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील काही भागांनाही बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान या वादळाच्या भीतीने किनारपट्टीच्या भागातून आतापर्यंत 3 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. तर ओडिशामध्ये लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 41 टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान या वादळाचा वेग सुमारे 200 किमी प्रतिसाद या वेगाने सुरू आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

 

Similar News