शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्या, प्रताप पाटील चिखलीकर यांची राज्य सरकारकडे मागणी

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून राज्यात संमिश्र पडसाद उमटत आहेत. त्यातच भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली जात असेल तर शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

Update: 2022-01-30 15:13 GMT

गुरूवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाला भाजपने जोरदार विरोध केला आहे. त्यातच नांदेडचे भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी देण्याची मागणी केली.

राज्य मंत्रीमंडळाने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. तर सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्याने वाईनरी आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असा दावा सरकारने केला आहे. त्यावरून प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, सरकारला दारू विक्रीतून उत्पादन वाढवायचे असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना गांजाचे उत्पादन घेण्यासाठीही परवानगी द्यावी. तसेच पुढे प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, नवाब मलिकांच्या जावयाने हर्बल तंबाखुच्या नावाखाली गांजा उत्पादन केलेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे केली.

Tags:    

Similar News