देशातील 'या' सर्वात महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा: राजेश टोपे

Update: 2020-05-27 16:36 GMT

लॉकडाऊन शिथिल केल्यानं लोकांचा प्रवास वाढला आहे. त्यामुळं ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते. तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Similar News