कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेनं अडवलं ; पोलिसांविरोधात महिलेची तक्रार

Update: 2022-08-15 07:38 GMT

 जालना येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेनं अडवल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी सुपारी घेऊन दुकानातील १५ लाखांचं सामान लंपास केल्याची तक्रार या महिलेने अब्दूल सत्तार यांच्याकडे केली.

देशभर आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभुमीवर राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार हे जालना येथे ध्वजारोहण करण्यासाठी गेले होते. पण मध्येच एका महिलेने अब्दूल सत्तार यांचा रस्ता अडवला. अॅड. रिमा खरात काळे असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने पोलिसांचीच तक्रार अब्दूल सत्तार यांच्याकडे केली.

शहरात एका दाम्पत्याचं स्टेशनरीचं दुकान होतं. ते दुकान खाली करण्यासाठी घर मालकानं पोलिसांना सुपारी दिली. दुकान रिकामं करताना दुकानातला 15 लाखांचा माल पोलिसांनी परस्पर लंपास केला. असा आरोप रिमा यांनी केलाय. उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरु यांनी हा सगळा प्रकार केला असल्याचं या महिलेनं म्हंटलंय. या प्रकरणात या महिलेनं ध्वजारोहण संपल्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना अडवलं. दरम्यान अब्दूल सत्तार यांनी या महिलेची बाजू ऐकून घेत या प्रकरणात चौकशी करण्यात येईल असं म्हंटलंय.

Tags:    

Similar News