स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गंगामाई कारखान्यावर आंदोलन

Update: 2021-11-13 14:04 GMT

अहमदनगर // अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गंगामाई कारखाना जोरदार आंदोलन केले. कारखाना गेटवर उसाने भरलेली वाहने अडवण्यात आली तर उसाचे गव्हाण बंद करण्यात आले. उसाला योग्य हमीभाव मिळावा तसेच ऊसतोड झाल्यावर 14 दिवसाच्या आत एकरकमी पैसे मिळावे, उस कारखानदारांनी कारखाना सुरू होण्याअगोदर भाव जाहीर करावा, ऊसाची रक्कम एकाच हप्त्यात मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

दरम्यान या लढ्याला यश आले आहे. गंगामाई साखर कारखान्याने 2351 भाव जाहीर केला, तसेच टायर गाडी ला 2400 रुपये भाव जाहीर केला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब लवांडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे औरंगाबादचे अध्यक्ष माऊली मुळे,ज्येष्ठ चंद्रकांत झारगड,ज्येष्ठ नेते अंबादास कोरडे,जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे,जिल्हा , अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष दादा टाकळकर,शेवगाव तालुका अध्यक्ष प्रशांत भराट,तालुका उपाध्यक्ष मेजर अशोक भोसले आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Tags:    

Similar News