सदावर्तेचा पाय आणखी खोलात ;क्रिस्टल टॉवरमधील अनधिकृत; इमारतीला अजूनही ओसी नाही

Update: 2022-04-20 09:37 GMT

एसटी आंदोलन आणि त्यानंतर शरद पवार यांच्या घरावरील हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी मात्र थांबायला तयार नाही. रहिवाशांच्या तक्रारी असलेल्या ते सध्या राहत असलेल्या मुंबईतील हिंदमाता येथील क्रिस्टल टॉवरला 2018 मध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा बळी गेला होता तर काही जण जखमी झाले होते. त्या दुर्घटनेनंतर या इमारतीला महापालिकेची ओसी मिळाली नसल्याची माहिती उघड झाली आहे.

जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून रजाक सुपारीवाला या बिल्डरने क्रिस्टल इमारत बांधली आणि घरे विकली. मात्र, इमारतीच्या मूळ आराखडय़ात आयत्या वेळी बदल करून तो आराखडा इमारत प्रस्तावाकडे मंजुरीसाठी पाठवल्याने इमारत प्रस्ताव विभागाने इमारतीला ओसी नाकारली होती. दरम्यान, ओसी मिळाली नसली तरी रहिवाशांना पाणी, विजेसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जात मात्र, अनधिकृत रहिवासी असल्याने त्यांच्याकडून नियमाप्रमाणे दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत आहे. सदावर्तेयांच्या कारनाम्यानमुळे आता सर्वच रहिवासी अडचणीत आले आहेत.

क्रिस्टर टॉवरला आजही ओसी मिळालेली नाही. इमारतीला ओसी हवी असेल तर बिल्डर आणि आर्किटेक्टने इमारतीमधील अनधिकृत बांधकामे तोडून टाकावीत आणि सुधारित आराखडा इमारत प्रस्ताव विभागाकडे पाठवला तर इमारतीला ओसी मिळेल आणि रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती इमारत प्रस्ताव विभागाने दिली.

हेल्थ सेंटरमध्ये सदावर्तेचे घर

गुणरत्न सदावर्ते राहत असलेल्या 1601 नंबरचे घर हे मूळ इमारत आराखडय़ात फिटनेस सेंटर म्हणून दाखवण्यात आलेले आहे. बिल्डरने त्यात बदल करून ते सदावर्ते यांना विकले. याबाबत सदावर्तेना नोटीस बजावण्यात आली आहे. इमारतीमधील हे सर्वात मोठे अनधिकृत बांधकाम आहे. ते तोडत नाही तोपर्यंत इमारतीला ओसी मिळणार नाही, असेही इमारत प्रस्ताव विभागाने स्पष्ट केले.

क्रिस्टल टॉवरमधील शेजाऱयांनी सदावतेंवर गंभीर आरोप केले आहेत. सर्वांबरोबर भांडतात, शिवीगाळ करत खोटय़ा प्रकरणात गुन्हे दाखल करू, अशा धमक्या देतात. त्यांच्याकडे चार गाडय़ा असून ते कुठेही पाकंग करतात. एसटी कर्मचाऱयांना झोपण्यासाठी इमारतीमधील टेरेसची जागा अनधिकृतपणे देतात, असा आरोप शेजाऱयांनी केला.

सदावर्ते हे परळ इथल्या या क्रिस्टल टॉवरच्या 16 व्या मजल्यावर राहतात. 2015 साली सदावर्तेंनी 2 बीएचकेचा फ्लॅट इथं खरेदी केला. ज्याची किंमत अंदाजे 1 कोटी 25 लाख आहे. सदावर्तेंकडे मालकीच्या 4 गाड्या आहेत. मात्र त्या चारही गाड्यांना पार्किंगची परवानगी नसतानाही गाड्या पार्क केल्यामुळेही अनेकदा वाद झाले आहेत. रहिवाश्यांच्या आरोपांनुसार सदावर्तेंनी स्वतःच्या घरात अनधिकृत बांधकाम केलंय, ज्याची तक्रार नगरविकास विभागाकडे देऊनही कारवाई झालेली नाही, असा दावाही सोसायटीमधील रहिवाशांनी केलाय.

दुसऱ्या एका रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार सोसायटीमध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याला सदावर्ते यांनी शिवीगाळ केली नाही किंवा त्यांच्याशी भांडण झालं नाही. प्रत्येक वेळी कोर्टात खेचण्याची भाषा केली जात. मान्य तुम्ही वकील आहात, पण मग त्याचा गैरफायदा घेणार का? बरं कोर्टात खेचून करणार काय? असा सवाल या रहिवाशाने विचारलाय. सोसायटीच्या सेक्रेटरी महिला आहेत. त्यांनीही महिनाभरापूर्वी त्यांच्या घरी जाऊन जयश्री पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदावर्ते कुटुंबाची समजून घेण्याची तयारीच नसल्याचं त्यांनी सांगितलं.

अल्पवयीन मुलीला गाडी चालवण्यास देणाऱ्या ऍड. गुणरत्न सदावर्ते व त्यांची पत्नी जयश्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठांची भेट घेऊन केली. 23 जुलै 2020 रोजी सदावर्ते यांनी त्यांची 12 वर्षीय मुलगी झेन हिला ठाणे ते दादर अशी चारचाकी गाडी चालवण्यास दिली. सदावर्ते यांची पत्नी जयश्री यांच्या नावावर ही गाडी रजिस्टर असून झेन हिने पूर्व द्रुतगती महामार्गावर ही गाडी चालवल्याचा हिडीओ सदावर्ते यांनी फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यामुळे सदावर्ते दाम्पत्याने मोटार वहन कायद्याचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने केली. याबाबत तपास करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.


Tags:    

Similar News