गुणरत्न सदावर्ते यांची कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कोर्टात कबूली

Update: 2022-04-20 11:16 GMT

एसटी कर्मचाऱ्यांच्या (st workers strike)संपाचं नेतृत्व करणाऱ्या आणि शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी अॅड.गुणरत्न सदावर्ते (gunratn sadwarte) यांना अटक केली होती.सदावर्तेंवर अनेक शहरात गुन्हा दाखल होत आहे.गिरगाव कोर्टाने यांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत केली.युक्तीवाद करत असताना एसटी कर्मचाऱ्यांनाकडून पैसे घेतल्याचं मान्य केलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता (mumbai police) मुंबई पोलिसांकडे आहे.यावेळी न्यायालयात सदावर्ते यांनी स्वत:ची बाजू मांडली.युक्तीवाद करत असताना एसटी कर्मचाऱ्यांनाकडून पैसे घेतल्याचं मान्य केलं आहे.मी एकाही कर्मचाऱ्याकडून पैसे घेतले नाहीत, एकही रुपया घेतला नाही,असं सदावर्ते याआधी वारंवार सांगायचे,मात्र आता त्यांनी पैसे घेतल्याचं मान्य केल आहे. सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत.सदावर्ते यांनी परळ आणि भायखळ्याची मालमत्ता व एक गाडी खरेदी केली.संपकाळात खरेदी करण्यात आलेल्या या मालमत्तेबाबत चौकशी करायची आहे,असा युक्तीवाद प्रदिप घरत यांनी कोर्टात केला आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा देण्यात आला . कोल्हापूर पोलीस सदावर्तेंच्या ताब्यासाठी सकाळी मुंबईच्या कोर्टात हजर झाले होते.

Tags:    

Similar News