#Lockdown स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांसाठी मेधा पाटकर यांचं उपोषण

Update: 2020-05-06 03:16 GMT

स्थलांतरित कामगारांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये एकवाक्‍यता नाहीये आणि ठोस धोरण नसल्याने कामगारांचे हाल सुरू आहेत. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी उपोषण सुरू केलं आहे. प्रवासादरम्यान वाहतूकदारांकडूनही कामगारांचे शोषण होत आहे. आणि सरकार त्यांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसल्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितरीत्या पोहोचविण्याची व्यवस्था करावी.

या मागणीसाठी मेधा पाटकर यांनी गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील ठिकरी इते त्यांनी उपोषण सुरू केले आहे. कामगारांबाबत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संवाद नाहीये. हजारो कामगार विनावेतन घराकडे पायी परत जात आहेत. रेल्वेचे विस्तृत जाळे असूनही वाहतुकीची पुरेशी व्यवस्था झालेली नाही. त्यांची सोय सरकारने केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे मेदा पाटकर यांनी सांगितले आहे.

Similar News