...तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार: आप

Update: 2020-09-29 13:48 GMT

आम आदमी पार्टी ने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. कोरोनाच्या काळात वीज बिल माफी व वीज दर वाढ मागे घेवून ३० % दर कपातीचे आश्वासन पूर्ण करावे. तसंच राज्यातील नागरिकांचे कोविडच्या चार महिन्याचे २०० युनिट पर्यंत बील माफ करावे. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल. अशा इशारा आम आदमी पक्षाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

या संदर्भात आम आदमी पक्षाने मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे पत्र पाठवलं आहे. नागपूर जिल्हा समिति सह खालील पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा समिति ने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

काय म्हटलंय पत्रात...

महोदय,

आपल्याला माहितच आहे की, अचानक केलेल्या लॉकडाउन मुळे लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. सर्वसामन्य जनतेला रोजच्या गरजा भागवीने देखील अवघड होत आहे. त्यातच महावितरण कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब सरकारच्या निदर्शनांला आणण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने वेळोवेळी आपल्याकडे निवेदन सादर केले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून केलेल्या मागण्या खालील प्रमाणे,

१. लॉकडाउन काळातील चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफ करणे.

२. दि. १ एप्रिल २०२० पासून करण्यात आलेली वीज दर वाढ मागे घ्यावी.

३. आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे ३०० युनिट पर्यंत ३०%, स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे.

४. राज्य सरकार चा 16% अधिभार आणि वहन कर रद्द करण्यात यावा.

५. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे.

६. कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले वीजबिल मागे घेवून मागील वर्षीच्या याच कालावधीत जे वीज देयक आले होते, त्याप्रमाणे महिनेवारीचे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत.

या मागण्याच्या निवेदनाची आपल्या सरकारने दखल न घेतल्याने, विजबिलांची होळी करणे, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणे, पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणे, तसेच महवितराण कार्यालयास टाळे ठोकणे, या सारख्या विविध आंदोलनातून सरकारला वरील मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.

आपल्या सरकार कडून याबाबत चर्चा केल्याच्या अनेक बातम्या प्रसारित झाल्या आहेत. परंतु आज पर्यंत सरकार कडून वरील पैकी कोणतीही मागणी पुर्ण केली नाही. आपण निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने लोकांची फसवणूक केल्यासारखे होत आहे.

तसेच महामारी दरम्यान विजेचे दर वाढविणे धोकाधडीचे वर्तन आहे, तरी वरील बाबी लक्षात घेवुन येणाऱ्या १ तारखेपर्यंत आपण ३०० यूनिट पर्यंत ३०% वीज स्वस्त न केल्यास, आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना जनतेला सोबत घेवून सर्व जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जनतेला फसवल्या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा नोंद करावा लागेल. तरी याची गांभिर्याने दखल घेत त्वरीत निर्णय घ्यावेत, ही विनंती.

धन्यवाद !

आपले स्नेही,

आम आदमी पार्टी नागपुर समिति

Similar News