दिल्ली पोलीस जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाण करत असलेला व्हिडीओ व्हायरल

Update: 2020-02-16 04:32 GMT

दिल्ली पोलीस जामिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करत असलेला व्हिडीओ सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ४९ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये पोलिस विद्यार्थ्यांना मारहाण करत असलेलं दिसतंय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर #ShameonDelhiPolice हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

१५ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजून ८ मिनीटांचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. यात काही विद्यार्थी अभ्यास करताना दिसत आहेत. काही सेकंदात पोलीस लायब्ररीमध्ये येताच आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. त्यानंतर पोलीस विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. मारहाण करत पोलिसांनी विद्यार्थ्यांना बाहेर पिटाळून लावलंय.

काल रात्रीपासून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता मोहम्मद झिशान अयुब, पत्रकार राणा अय्युब यांनीही हा व्हिडीओ आपल्या ऑफशियल अकाऊंटवरून पोस्ट आणि रिट्विट केला आहे. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या अकाऊंटवरूनही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आली आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलीस किंवा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोणताही अधिकृत खुलासा अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही.

Similar News