पवई आयआयटी गेट समोर असलेल्या एक पडीक जागेत भीषण आग

Update: 2021-11-04 02:49 GMT

पवई// पवई आयआयटी गेट समोर असलेल्या एक पडीक जागेत आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणत कचरा, प्लास्टिक आणि बांबू पडलेले होते.त्यामुळे लागलेली आगीने काही वेळेताच जोर धरला. स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.काही वेळेतच अग्निशमन दलाच्या जवांनानी या आगीवर नियंत्रण मिळविले.आग लागली होती त्या ठिकाणी आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आहे. सुदैवाने आगीवर लवकर नियंत्रण मिळविल्याने आग आजूबाजूच्या वस्तीत पसरली नाही आणि मोठी हानी टळली आहे.आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

Tags:    

Similar News