घरगुती वादामुळे 55 वर्षीय व्यक्ती चढला BSNL च्या टॉवरवर ; पाच तासांच्या प्रयत्नानंतर व्यक्तीस खाली उतरवण्यात यश

घरगुती वादामुळे 55 वर्षीय व्यक्ती BSNL च्या टॉवरवर चढल्याचा प्रकार बुलडाण्यातून समोर आला तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर व्यक्तीस खाली उतरवण्यात यश आहे.

Update: 2021-08-10 05:26 GMT

बुलडाणा : बुलडाणा शहरात घरगुती वादामुळे एक 55 वर्षीय व्यक्ती BSNL कार्यालयाच्या टॉवरवर चढल्याची घटना समोर आली. मिलींद नगर येथील संजय जाधव हे काल दुपार चार वाजण्याच्या सुमारास टॉवरवर चढले होते, तब्बल पाच तासानंतर त्यांना खाली उतारवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

बुलडाणा शहराच्या BSNL मुख्यालयात असलेल्या साडेतीनशे फुट ऊंच मोबाईल टॉवर संजय जाधव अचानक चढल्याचने परिसरात एकच खळबळ उडाली, घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे जाधव यांना पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर जाधव यांना टॉवरवरून उतरवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. घरगुती वादामुळे तसेच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जाधव या टॉवरवर चढले होते. दरम्यान त्यांना टॉवरवरून खाली उतवरण्यासाठी जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.

यावेळी बुलडाणा पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, तहसीलदार रूपेश खंदारे, पोलिस निरीक्षक प्रदिप साळुंखे, नायब तहसिलदार अमरसिंह पवार यांच्यासह त्यांच्या टीमने जाधव यांची समजूत काढत त्यांना टॉवरवरून खाली उतरवले. मात्र, या सर्व गोंधळामुळे शासकिय यंत्रणेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान जाधव हे संबधित टॉवरवर चढत असताना त्याठिकाणी त्यांनी कोणी कसे पाहिले नाही?, त्या ठिकाणी सुरक्षारक्षक का नव्हता? याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान याबाबत पुढे काय कारवाई होते याकडे शहरवासियांच्या नजरा लागल्या आहेत .

Tags:    

Similar News