बुलढाण्यात महिलेवर सामूहिक अत्याचार, संजय गायकवाड आक्रमक, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Update: 2023-07-14 07:46 GMT

बुलढाणा जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक होत पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.

बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाटात 35 वर्षीय महिलेवर आठ जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये आठ जणांनी चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार करत तिच्याकडे असलेले 45 हजार रुपयेही लुटून आरोपी फरार झाले.

बुलढाणा मलकापूर महामार्गावर असलेल्या राजूर घाटात महिला तिच्या नातेवाईकासह सेल्फी घेण्यासाठी थांबली होती. त्यावेळी मागून आलेल्या 8 जणांच्या टोळक्यांनी त्यांच्याकडे असलेली रक्कम लूटली. त्यानंतर पुरुष आणि महिलेला मारहाण केली. तसेच महिलेला दरीत ओढून नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्याप्रकरणी बोराखेडी येथे तक्रार दाखल केली. मात्र यानंतर पोलिसांनी सहकार्य न केल्याचा आरोप करत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक होत तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणानंतर आठ जणांचं टोळकं मोहेगावच्या दिशेने गेले. त्यावेळी तरुणाने त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी मोहेगाव येथील लोकांनी त्यातील एका आरोपीचे नाव राहुल असल्याचे सांगितले. मात्र या प्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

आरोपींनी लवकरच जेरबंद करू

पोलिसांनी या प्रकरणी माहिती देतांना सांगितले की, बुलढाण्याच्या राजूर घाटात घडलेली घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी आम्ही तीन पथके रवाना केली आहेत. तसेच फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकं यासाठी रवाना केले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल क़डासने यांनी दिली.

Tags:    

Similar News