5 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकोरमायकोसिसने मृत्यू, राज्यातील पहिलीच घटना

Update: 2021-06-16 06:37 GMT

लोणी, नगर - राज्यात व देशात कोरोनाचे संकट असताना म्यूकोरमायकोसिसने वैद्यकीय यंत्रणेसमोर एक आव्हान निर्माण केलं आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील डॉ. बाळासाहेब विखे पाटील रुरल मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक 5 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकोरमयकोसिसने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एवढ्या लहान बाळाचा म्यूकोरमायकोसिसने मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचं डॉक्टरांनी म्हंटले आहे.

१३ जून रोजी या 5 महिन्याच्या कोरोनाबाधित चिमुकलीला नाशिकच्या हॉस्पिटलमधून लोणीच्या डॉ. बाळासाहेब विखे पाटील रुरल मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही नुलगी रुग्णालयात दाखल झाली तेंव्हा ती व्हेंटिलेटरवर होती, अशी माहिती डॉ. बाळासाहेब विखे पाटील रुरल मेडिकल हॉस्पिटलचे डीन

नि. एअर मार्शल राजवीर भलवार यांनी दिली. तिच्या नाकाच्या वरच्या भागावर लाल रंगाचे डाग दिसू लागल्याने हॉस्पिटलच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने तातडीने तिचे नमुने घेत म्यूकोरमकोसिसची तपासणी केली.

ऐरवी या चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी 3 दिवस लागतात. त्यानंतर देखील पुढील 5 दिवस निरीक्षण केल्यावर म्युकोरमायकोसिस आहे की नाही याबाबत खात्री केली जाते. मात्र त्याआधीच या चिमुकलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

दरम्यान डीन भलवार यांनी सांगितले की, आम्हाला या चिमुकलीमध्ये म्युकोरमायकोसिसची लक्षणे दिसताक्षणी आम्ही तिचे नमुन्याचे KOH स्टेनिग केले.लहान मुलांना ज्याप्रमाणात इन्फोटेरेसिम बी दिले जाते ते देखील दिले गेले मात्र दुर्दैवाने आम्हाला या चिमुकलीचे प्राण वाचवण्यात अपयश आले. आम्ही एम आर आय तपासणी केली तेंव्हा या चिमुकलीच्या मेंदूत म्युकोरमायकोसिसच मोठ्या प्रमाणात पसरल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान एवढ्या लहान बाळाचा म्युकोरमायकोसिसने मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याने वैद्यकीय यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभे राहिले आहे.अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी आरोग्य प्रशासनाने सतर्क होण्याची आवश्यकता आहे.

Tags:    

Similar News