४१ हजार रेल्वे डब्यांचं होणार वंदे भारत मध्ये रूपांतर;वाचा आजच्या अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा

Update: 2024-02-01 09:54 GMT

मोदी सरकारच्या या सरकारमधील शेवटचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडला. सितरामन यांचा अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा सहावा अर्थसंकल्प होता त्यांनी अर्थसंकल्प मांडण्याचा मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येईल. आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा झाली ती म्हणजे ४१ हजार डब्यांचं वंदे भारत मध्ये रुपांतर करण्याची.




 

पाहुयात या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे

१. लखपती दिदींची संख्या २ कोटींहून ३ कोटींवर नेण्यात येणार . आतापर्यंत १ कोटी महिला लखपती झाल्या आहेत.

२. आयुष्यमान योजनेचा लाभ आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना घेत येईल.

३. पायाभूत सुविधेसाठीच्या खर्चात ११ % ची वाढ करण्यात येणार

४. रुफ टॉप सोलार योजनेच्या अंतर्गत १ कोटी घरांना ३०० युनिट्सपर्यंतची वीज मोफत देण्यात येणार.

५. जलद प्रवासासाठी आणि सुविधेसाठी रेल्वेच्या 41हजार डब्यांचं रुपांतर वंदे भारत रेल्वे बोग्यांमध्ये करण्यात येईल.

६. तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्यात येणार .त्याची जोडणी ऊर्जा,खनिज आणि बंदरांशी करणार.

Tags:    

Similar News