कोरोनाशी लढा – लातूरकरांना मोठा दिलासा

Update: 2020-04-09 03:21 GMT

कोरोनाचा फैलाव राज्यभरात झाल्यानंतर सर्वत्र चिंतेचं वातावरण असताना लातूकरांना दिलासा देणारी बातमी आहे. काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये कोरोनाचे ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. पण आता या ८ पैकी ३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एकाचा अहवाल अजून प्रलंबित आहे.

हे सर्व रूग्ण लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत आहेत. सर्व रुग्ण हे हरियाणातुन आलेले होते. या ०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २५ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे अहवालसुध्दा आता निगेटिव्ह आल्यानं लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Similar News