कोरोनाचा कहर – नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले

Update: 2020-04-20 15:20 GMT

नंदुरबार शहरात दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण शहर तीन दिवस बंद ठेवण्यात आले. पण आता या कोरोनाबाधीत रुग्णाच्या कुटुंबतील आणखी तीन जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.

नंदुरबार शहरातील एका भागातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं उघड झाले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतरांचीही चाचणी करण्यात आली. त्यात कुटुंबातील 65 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी आणि तर 21 वर्षांच्या तरुणाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नंदुरबार शहर आता पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

कोरोनाबाधीत रुग्ण सापडलेल्या भागातील सर्वच नागरिकांची तपासणी आता करण्यात येत आहे. कुणीही घराच्या बाहेर पडू नये असे आदेश प्रशासनाने दिलेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जनतेला केलं आहे.

Similar News