गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेले 272 जण कोरोना पॉझिटिव्ह

Update: 2021-09-22 11:25 GMT

रायगड:- कोकणात गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर भागांतून कोकणात गेलेल्या गणेशभक्तांपैकी २७२ जणांना करोनाची लागण झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयांकडून ही माहिती देण्यात आली. या पॉझिटिव रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यंदा गणेशोत्सवानिमित्त जवळपास दोन लाख १७ हजारांहून अधिक गणेशभक्त कोकणात दाखल झाले होते. त्या तुलनेत करोनाबाधितांचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या १ लाख ३० हजार जणांपैकी ९० हजार जण करोना चाचणी करून आणि दोन लसमात्रा घेऊन आलेले होते. ४० हजार जण चाचणीसाठी पात्र होते; परंतु त्यातील साधारण २० हजार जण १८ वर्षांखालील होते, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिली. उर्वरित २० हजार जणांपैकी १२० जणांना करोनाची लागण झाल्याचे चाचणीत आढळून आले. त्याव्यतिरिक्त ७२ जणांना करोनासदृश लक्षणे होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:    

Similar News