राज्यातील 10.5 टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते....

Update: 2020-03-05 11:09 GMT

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अहवालामध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 10.5 टक्के लोकसंख्या झोपडीत राहत असल्याचं समोर आलं आहे. देशाच्या तुलनेत हे प्रमाण 5.4 टक्के आहे.

भारतातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकसंख्येपैकी 18.1 टक्के लोकसंख्या व एकूण झोपडपट्ट्यातील कुटुंबापैकी 17.8 टक्के कुटूंब महाराष्ट्रात राहतात. देशाच्या स्तरावर आपण जर झोपडपटट्यांच्या आकाराचा विचार केला तर तो 4.7 आहे.

Similar News