देशी दारू दुकानवार महिलांचा हल्लाबोल - लातूर

Update: 2018-09-04 12:10 GMT

लातूर शहरातली दारू दुकाने २४ तास सुरु राहत असल्याची ओरड कायम होत असते. शहरातल्या देशी दारूच्या दुकानांनी हजारोंचे संसार उध्वस्त केलेच आहेत. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी आज लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक १२ मधल्या देशी दारू दुकानावर हल्ला चढवला . प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही दारू दुकान बंद होत नसल्याने त्रस्त महिलांनी दारूच्या दुकानात घुसून तोडफोड करीत दारू दुकान तात्काळ हटविण्याची मागणी केली. हे दारू दुकान जुन्या रेल्वे लाईनच्या डांबरी रस्त्यावर पीव्हीआर चौका जवळ आहे . या भागात आता मोठ्या प्रमाणात वस्ती झाली आहे. उच्चं शिक्षित लोक या भागात आता राहायला आले आहेत. एवढेच नव्हे तर इथे शैक्षणिक संस्था आणि भाजीपाला बाजारही असल्याने महिलां-मुलांची गर्दी असते. महिलांनी फोडलेल्या दारू दुकानातून बाहेर पडलेले बेवडे इथे गोंधळ घालत असतात. त्यामुळे हे दुकान तात्काळ हटवावे यासाठी महिलांनी आज अंदोलन केले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे निवेदन देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने अंदोलन करावे लागल्याचे नगरसेविका दीपाताई गीते आणि मीनाक्षी शेट्टे यांनी सांगितले. या आंदोलनात नगरसेवक देवानंद साळुंखे, प्रवीण अंबुलगेकर, शशीकला गोमसाळे, गणेश गोमसाळे, सुशील जळकोटे, अन्सार शेख, यांच्यासह मोठ्या संख्येने या भागातील महिला उपस्थित होते. यावेळी महिला आणि देशी दारू दुकानदार यांच्यात बाचाबाची झाली त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

Similar News