फक्त १०० कलावंतांनाच पेन्शन योजनेचा लाभ का?

Update: 2023-01-14 13:26 GMT

गेल्या अनेक वर्षापासून देशात अनेक कलावंत आपापल्या माध्यमातून आपली कला देशाची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी काम करत आहेत. अशातच या कलावंताकडे शासनाकडून दुर्लक्ष होतं आहे. तसेच शासनाकडून मिळत असलेल्या पेन्शन योजनेचा लाभ फक्त १०० कलावंतांना मिळत आहे. त्यापेक्षा अधिक कलावंतांना पेन्शन योजनेचा लाभ का मिळत नाही. असा प्रश्न आता कलावंतांनी विचारला आहे. वर्धा जिल्ह्यातील पाथरी व येकुर्ली येथील कलावंत मंडळांनी १५ ते २० वर्षापासून आपली कला देशाची संस्कृती म्हणून टिकून ठेवली आहे.

आपल्या कलेच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधनात्मक काम करत आहेत. व्यसनमुक्ती तसेच समाज सुधारणा विषयांच्या गीतांमधून ते त्यांचे कार्य करत आहेत. हे कलावंत आपल्या भजनी मंडळाच्या माध्यमातून गावा-गावा मध्ये आयोजित करण्यात भजन स्पर्धा तसेच दिंडी स्पर्धा मध्ये जाऊन त्यांची कला सादर करत असतात. मात्र कलावंतांना शासनाकडून मिळत असलेल्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही, असा आरोप कलावंत असलेल्या उज्ज्वला चरडे यांनी केला आहे.

आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये घालवलेलं, ते कलावंत आज पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. शासनाकडून कलावंतांना मिळत असलेल्या पेन्शन योजनेचा लाभ सर्व कलांवंतांना मिळावा यासाठी वर्धाच्या सर्वधर्म समभाव सांस्कृतिक कला मंच या संस्थेकडून कलांवंतांना मार्गदर्शन केले जात आहे. असे संस्थेच्या संस्थापिका दिपमाला मालेकर यांनी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News