factcheck : मौलानाचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अनेक पोस्ट, व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओंच्या मागे नेमके कोण असते, असे व्हिडिओ खरे असतात की मुद्दाम बनवलेले असतात, याचा शोध घेणारा हा रिपोर्ट

Update: 2022-09-20 13:56 GMT

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत तुम्ही कधी खात्री करुन घेता का, कारण अनेकवेळा फेक व्हिडिओ किंवा तयार करण्यात आलेले व्हिडिओ सत्यघटना म्हणून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. Madhu Purnima Kishwar यांनी एक व्हिडिओ ट्विट करत भारतात महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुस्लिमांच्या संघटीत गुन्हेगारीबाबत सखोल चौकशी करुन दोषींना शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे. त्यांनी हा व्हिडिओ केंद्रीय गृहमंत्रायाला टॅग करत व्टिट केला आहे.

पण मधु पूर्णिमा किश्वर यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमागील वास्तव अल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेर यांनी एका व्हिडिओद्वारे सगळ्यांसमोर आणले. किश्वर यांनी ट्विट केलेला व्हिडिओ मुद्दाम तयार करण्यात आला असून त्यात दिसणाऱ्या वृद्ध व्यक्तीने अशा अनेक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. असे सांगत त्यांनी त्या व्यक्तीचे काही व्हिडिओच शेअर केले आहेत.

वृद्ध मुस्लिम म्हातारा महिलेवर अत्याचार करत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर तो व्हिडिओ मुद्दाम तयार कऱण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले देखील होते. हा मुळ व्हिडिओ ११ मिनिटांचा आहे आणि एका क्राईम सीनच्या शूटिंगसाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. त्याचाच काही भाग एडिट करुन छोटे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत, असे फॅक्ट चेक काही न्यूज चॅनेल्सनेही केले आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. पण यापुढे सर्वांनीच सोशल मीडियावरील पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करताना ते खरे आहेत का, त्यामुळे धार्मिक, सामाजिक तेढ तर निर्माण होणार नाहीयेना, कोणत्या व्यक्तीची बदनामी होणार नाही ना या सगळ्याचा विचार करुनच शेअर केले पाहिजेत...


Full View

Tags:    

Similar News