Video : नेत्याच्या खिशातून ५० हजार चोरणारा महाचोर

Update: 2022-03-30 11:46 GMT

एका राजकीय नेत्याच्या खिशातून भर स्टेजवर लोकांच्या देखत ५० हजार रुपये लंपास करणारा महाभाग कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सांगलीमध्ये ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री विजय वडेट्टीवार आणि अनेक नेत्यांची उपस्थिती होती. त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते हे त्यांचा सत्कार करत असताना एकाने त्यांच्या खिशातील पैशांचे पाकीट लंपास केले. स्टेजवर येऊन या चोराने पन्नास हजार रुपये लंपास केले. त्या चोरट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Full View

Tags:    

Similar News