पेट्रोल पंपावर भोंगे, काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Update: 2022-04-18 12:30 GMT

पुणे – राज्यात एकीकडे भोंग्यांवरुन राजकारण तापले असताना काँग्रेसने मात्र महागाईवरुन केंद्र सरकारविरोधात आपली आक्रमक भूमिका कायम ठेवले आहे. पुण्यामध्ये सोमवारी महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसने आंदोलन केले. महागाईविरोधात वडगाव शेरी येथे पेट्रोल पंपावर भोंगे वाजवून आंदोलन करण्यात आले. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पेट्रोल पंपावर भोंगे लावून आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.

Full View
Tags:    

Similar News