Social Audit with Dhanraj Vanjari - 2 : आम्ही आमची लोकशाही गाडली, तेही बिनविरोध!

मॅक्स महाराष्ट्रचा Social Audit with Dhanraj Vanjari या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात निवडणुका जिंकण्याच्या सुरू असलेल्या ट्रेंडचं ऑडिट केलंय ॲड. धनराज वंजारी यांनी वाचा आणि पाहा

Update: 2026-01-15 06:09 GMT

Max Maharashtra मॅक्स महाराष्ट्रचा Social Audit with Dhanraj Vanjari या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात राज्यातल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने ॲड. धनराज वंजारी यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि सध्या सुरु असलेल्या राजकारणावर निरिक्षणात्मक विश्लेषण केलं आहे. निवडणुका जिंकण्याच्या सुरू असलेल्या ट्रेंडचं ऑडिट करताना वंजारी यांनी काय म्हटलंय..

सध्या सत्ताधारी पक्ष आणि नेत्यांकडून पैसा, सत्ता आणि दबाव यांच्या जोरावर उमेदवारांना खरेदी केलं जात आहे किंवा त्यांना माघार घेण्यास भाग पाडलं जात आहे. मतदारांना खरेदी करण्याऐवजी थेट उमेदवारांना 'खरेदी' करण्याची प्रथा रूढ झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध होत आहेत.

वंजारी यांनी नमूद केलं की, आतापर्यंत ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. हे बहुतेकजण सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक किंवा जवळचे असल्याचं सांगितलं जात आहे. “बिनविरोध निवड हे लोकशाहीचं पारितोषिक नाही, तर सत्ता, पैसा आणि दबाव यांच्या संयोगाने मिळवलेलं एक खास प्रमाणपत्र आहे,” असं ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३२ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासाठी लढा दिला, त्यावेळी लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदारांना केंद्रस्थानी ठेवलं होतं. पण आज मतदारांना बाजूला सारून लोकशाहीचा अंत झाला असल्याची टीका त्यांनी केली. “लोकशाही संपली आहे, तुम्हाला फक्त जागृत करण्यासाठी हे बोलतोय,” असं ते म्हणाले. वंजारी यांनी समाजाला 'बौद्धिक आणि मानसिक निष्क्रियते'तून बाहेर पडण्याचे आवाहन केलं असून, कॉर्पोरेट प्रभाव आणि सामाजिक उदासीनतेमुळे लोकशाही कमकुवत होत असल्याचं सांगितलं. त्यांनी याबाबत सामाजिक ऑडिट करण्याची गरज व्यक्त केली आहे.

Social Audit with Dhanraj Vanjari Episod -2


Full View

Similar News