मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या “दुष्काळात”, सामाजिक, राजकीय असंतोषाचा “तेरावा” महिना

Update: 2019-12-26 04:26 GMT

सामाजिक, जातीय, धार्मिक, राजकीय मुद्यांवर असंतोष हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी मिळून तो सोडवतील असे अनेकांना वाटते. अर्थतज्ञ, अर्थमंत्री सामाजिक / राजकीय असंतोषाची काळजी करण्याची गरज नाही. ते स्वतंत्रपणे अर्थव्यवस्था हाताळतील असे अनेकांना वाटते.

पण दुर्दैवाने ते तसे नसते.

हे ही वाचा

पुण्यात महाविकास आघाडीसह मनसेचा हंडा मोर्चा

‘बाई जरा दमानं घ्या’, अमृता फडणवीस यांना कोणी दिला असा सल्ला?

CAA आणि NRC च्या विरोधात रबीहाचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत सुवर्ण पदक घेण्यास नकार

समाजातील ताणतणाव, असंतोष याचा अर्थव्यस्वस्थेवर होणारा परिणाम चटकन आकळत नाही, पण तो नक्कीच गंभीर असतो.

(१) व्यक्ती / कुटूंब आनंदी, सुखी असतील तर त्यांना विविध गोष्टींचा उपभोग घ्यावासा वाटतो; ताणतणावत, दुःखात अत्यावश्यक गोष्टी सोडल्या तर पैसे असून देखील उपभोग घ्यावासा वाटत नाही.

(२) ज्या भूभागात काही कारणांमुळे ताणतणाव तयार होतात. त्या भूभागात “मार्केटच्या खेळाचे” नियम मोडून पडतात. वस्तुमाल / सेवाची “परक्या” कडून खरेदी/ विक्री टाळली जाते.

(३) भविष्यकाळाबद्दल कोणत्याही प्रकारची अनिश्चितता तयार झाली की, कुटुंबे आपल्या बचती वाढवण्याचे ठरवतात. खर्च आखडता घेतात. त्यात सुरक्षितता शोधतात.

(४) नवीन प्रॉडक्ट, नवीन मार्केट, नवीन प्रयोग करायची मानसिकता, जोखीम घ्यावीशी वाटत नाही. उत्पादकता थिजते.

(५) अनौपचारिक क्षेत्रात पैशाची देवाणघेवाण निवडक लोकांबरोबरच होते. पैसे हे स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये रक्ताभिसरणाचे काम करतात. ते थंडावते.

(६) मार्केट थंडावते तसे उत्पादक कोणतीही नवीन गुंतवणूक करीत नाहीत; त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर होतो. सामाजिक सलोखा हा रसरसणाऱ्या अर्थव्यस्वस्थेचा पाया असतो.

क्लासिकल भांडवलशाहीला हे सारे माहित आहे. पण आपल्या देशातील भांडवलदार व भांडवलशाहीचे समर्थक कोणत्याही परिस्थितीत सामाजिक, जातीय, धार्मिक ताणतणाव नको आहेत. मतभेद आहेत ते सामोपचाराने सोडवुया अशी स्पष्ट भूमिका घेत नाहीत.

Similar News