रिपब्लिकच्या पत्रकाराला चोप का मिळाला?

Update: 2020-09-26 03:55 GMT

पत्रकारितेच्या इतिहासात बुधवारचा दिवस कायम आठवणीत राहिल....कारण या दिवशी काही पत्रकारांनी एका पत्रकाराल चोप दिलाय....आपल्याच व्यवसायातील व्यक्तीवर हात उचलण्याची वेळ पत्रकारांवर का आली? का या सर्व पत्रकारांचा संयम सुटला....

मुंबईच्या रस्त्यावर एकमेकांना भिडणारे इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार होते. रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारावर त्यांनी हात उचलण्यापर्यंत असे काय झाले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ज्याला चोप दिला गेला तो होता रिपब्लिक वाहिनीचा पत्रकार प्रदीप भंडारी....NCBच्या ऑफिसबाहेर जमलेल्या पत्रकारांना या महाशयांनी चाय बिस्कुट खानेवाले पत्रकार असे संबोधले आणि मग यानंतर इतर पत्रकारांच्या संतापाचा भडका उडाला....

केवळ एवढ्या अपमानाने हे पत्रकार चिडले का....तर नाही....गेल्या काही दिवसात रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी ज्या पद्धतीने स्टुडिओमधून आक्रमकपणे बोलताय, तिच स्टाईल त्यांचे पत्रकार फिल्डवर कॉपी करताना दिसत आहेत. रस्त्यात उड्या मारणं, तावातावाने बोलणे अशी विचित्र पद्धतीने हे रिपोर्टर फिरत वागत आहेत.

आता हा असा प्रकार जर सुरू असेल तर इतर पत्रकारांना त्याच ठिकाणावरु लाईव्ह करताना किती अडचणी येतात, त्यांना डिस्टर्ब होते याचा विचारही या महाशयांच्या मनात आलेला नाही....त्यात अत्यंत विक्षिप्तपणे रिपोर्टिंगचे प्रकार या वाहिनेचे पत्रकार करत आहेत...

आता रिपोर्टिंग करायचे तर काही तारतम्य या रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराने दाखवणे गरजेचे होते. पण गेल्या काही दिवसात काही राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांच्या पत्रकारांनी असे सगळे ताळतंत्रच सोडलेले दिसते आहे.....त्यामुळेच इतर पत्रकार डिवचले गेल्याने त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला...आणि मारहाण झाली....अर्थात त्यांनीही संयम बाळगणे गरजेचे होते एवढे मात्र नक्की...

Full View

Similar News