''पुण्याचं नाव जिजाऊमाता ठेवावं'' अमोल मिटकरी यांनी मागणी

Update: 2023-01-14 05:44 GMT

काल जिजामाता जन्मोत्सवाच्या वेळी अमोल मिटकरी म्हणाले की, पुण्याचं नाव जिजाऊ ठेवावं कारण शिवाजी महाराजांन सोबत घेऊन राजमाता जिजाऊ यांनी चारशे वर्षांपूर्वी मुरार जगदेवाची दहशत मोडून काढत महाराष्ट्रात एक शहर वसवल. ज्याला आपण आता पुणे म्हणतो , राजमाता जिजाऊ यांनी त्यावेळी राजेश्वराच्या साक्षीने स्वराज्याचे तोरण शिवारायांच्या हातून बांधून घेतले, तर काल जिजामाता यांचा जन्म महोत्सव सिंदखेड राजा येथे साजरा झाला.

त्या ठिकाणी अनेकांनी आपली भावना व्यक्त करून दाखवली. जशी आता शहराची नावे बदलली जात आहेत. त्याप्रमाणे पुण्याचं ही नाव हे जिजाऊमाता कराव अशी मागणी माझ्याकडून आणि जनतेकडून होत आहे. ज्यांना विरोध करायचा ते करू द्या कारण पूर्वीपासून हे चालत आलेल आहे. पूर्वी विरोध होता आणि यापूर्वी ही राहणार. तसेच बेंगलोरच नाव शहाजी महाराज ठेवाव अशी देखील मागणी करत त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पुण्याचे नाव जिजाऊ माता ठेवावा ही मागणी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचेही यावेळी मिटकरी म्हणाले आहेत. 


Full View

Tags:    

Similar News