का लांबतोय राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?

Update: 2019-12-24 04:27 GMT

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल अशी चर्चा असताना केवळ सहाच मंत्र्यांचा शपथविधी झाला. उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी अधिवेशन संपताच होईल. असं तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं, पण अधिवेशन संपलं असलं तरी अजूनही विस्ताराबाबत कोणतीही हालचाल दिसत नाहीये.

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची मोठी कारणं

१. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या याद्य़ा तयार, काँग्रेसची यादी अद्यापही तयार नाही

२. मंत्रिपदं देताना प्रादेशिक समतोल राखण्यासाठी काँग्रेसची तारेवरची कसरत

३. यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच

४. काही खात्याच्या अदलाबदलीचा काँग्रेसचा प्रस्ताव, अजूनही निर्णय नाही, काँग्रेसकडून उद्योग खात्याची मागणी

५. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय पुनर्वसनावरुन अजूनही पक्षांतर्गत घोळ सुरूच

६. दिल्लीत हायकमांडचा हस्तक्षेप आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा दिल्लीत मुक्काम

७. नवख्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद

८. शिवसेना आणि राष्ट्रवादीशी बोलणी करताना बाळासाहेब थोरातांनी मवाळ भूमिका घेतल्याचा काही काँग्रेस नेत्यांची तक्रार

९. सीएए, एनआरसी, सावरकर मुद्द्यांवरुन शिवसेनेची भूमिका स्पष्ट नसल्यानं काँग्रेसनं बाहेरुन पाठिंबा देण्याचा एक मतप्रवाह

१०. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद आणि शरद पवारांचा सरकारवरील वरचष्मा स्पष्ट दिसत असल्यानं अनेक काँग्रेस नेते अस्वस्थ

११. विजय वडेट्टिवार यांच्या समावेशाला पक्षातील अनेकांचा विरोध, त्यामुळे विरोक्षी पक्षनेतेपद भूषवलेल्या नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर कसं ठेवायचं यावरुन संभ्रम.

Full View

Similar News