बुलढाण्यातील लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
लोणार सरोवराचे कार्बन डेटिंग वापरून काढलेले वय ५,४७,००० आहे.विज्ञान,सौंदर्य, भूगोल या कारणासाठी जगाचे आकर्षण ठरलेल्या लोणार सरोवर दरम्यान मॅक्स महाराष्ट्राच्या टीमने भेट दिली.. त्यावेळी स्थानिक अभ्यासक गजानन खरात यांच्याशी संवाद साधला..