केळी पट्ट्यात पोलिसांचा धाक संपला का ?

Update: 2022-02-27 18:32 GMT

जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पट्ट्यात समाजकंटकांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाजकंटक केळीच्या बागा कापून टाकत आहेत. आज रविवारी सकाळी अशाच दोन घटना उघडकीस आल्या. केळी बागांचं नुकसान करण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू आहे. यामुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, प्रतिनिधी संतोष सोनवणेंचा रिपोर्ट...

चिनावल-सावदा परिसरात समाजकंटकांनी सुरवातीला केळीच्या बागा, आणि त्यानंतर आज ठिबक सिंचन साहित्य जाळून टाकलं, यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय .दोन दिवसांपूर्वीच चिनावल येथील शेतकरी प्रमोद भंगाळे यांच्या शेतातील 10 हजार केळी खोडांचे तसेच ठिबक सिंचन साहित्य समाजकंटकांनी जाळून टाकलंय.

दुसऱ्या एका शेतकऱ्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्याच्या शेतातील केळीची बाग कापून टाकली आहे. समाजकंटकानी शेती आणि शेतकऱ्याला टार्गेट केल्याचं चित्र आहे. पोलिसांचा धाक शिल्लक राहिला नसल्याने गेल्या काही दिवसात अश्या घटना वाढल्या आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यात अनेकदा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या मात्र पोलिसांकडून कोणतीच कारवाही करत नाही अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.यामुळे पोलिसांवर शेतकरी नाराज असल्याने सकाळीच संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोखो आंदोलन करण्याची वेळ आली.

पोलीस प्रशासनाने अशी कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सावदा शहरातील मुख्य चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी महामार्गावर दोन्ही बाजूला ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक रोखून धरली होती. आमदार शिरीष चौधरी तसेच खासदार रक्षा खडसें दोषींवर कारवाही करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांचा चोरीचा माल रेल्वे मार्फत पाठवला जातो यामुळे रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी रक्षा खडसेंनी केली.

Tags:    

Similar News