सुषमा अंधारे आंबेडकरवादी की हिंदूत्ववादी? स्फोटक मुलाखत

आंबेडकरवादी सुषमा अंधारे शिवसेनेत का गेल्या? सुषमा अंधारे हिंदूत्वावादी की आंबेडकरवादी? सुषमा अंधारे यांची विचारसरणी बदलली आहे का? ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला होता. त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात सुषमा अंधारे का गेल्या? याबरोबरच सुषमा अंधारे यांचे राष्ट्रवादीशी नातं काय? या प्रश्नांचा वेध मॅक्स महाराष्ट्रचे सीनियर करस्पाँडंट संतोष सोनवणे यांनी घेतला आहे.

Update: 2022-11-04 13:00 GMT

एकेकाळी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर एकेरी हल्लाबोल करणाऱ्या सुषमा अंधारे (sushama Andhare) यांनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला आहे. त्यावरून विरोधक टीका करत आहेत. मात्र आंबेडकरवादी विचारसरणी ते हिंदूत्ववादी (Hindutva) विचारसरणी हा सुषमा अंधारे यांचा प्रवास कसा झाला? या प्रश्नाला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले. यामध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी माझी विचारसरणी सोडली नाही. मी अजूनही माझ्या चळवळीशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या चळवळीपासून करते. याबरोबरच ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या (Marathwada University) नामांतराला विरोध केला होता. त्यांच्याच पक्षात तुम्ही गेले आहात, याचे नेमकं कारण काय? असा सवाल करताच सुषमा अंधारे म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याविरोधात आमचे मतभेद होते. मात्र सध्या व्यापक राष्ट्रहिताचा विचार महत्वाचा असल्याने आम्ही उध्दव ठाकरे यांना पाठींबा दिल्याचे सुषमा स्वराज म्हणाल्या.

याबरोबरच सुषमा स्वराज यांनी राष्ट्रवादी पक्ष का सोडला? याबाबत प्रश्न विचारल असता मी शरद पवार यांची निकटवर्तीय आहे. मात्र मी कधीच राष्ट्रवादीचा झेंडा घेतला नाही. संविधानाची चळवळ वाचवण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्यासोबत आल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Full View

Tags:    

Similar News