मोदींच्या लडाख दौऱ्याचा अन्वयार्थ

Update: 2020-07-04 01:30 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लेहचा दौरा अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मोदींच्या या दौऱ्यामुळे भारतीय सैन्याचे मनोधैर्य वाढलं असून १३० कोटी जनता आमच्या सैन्याच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचा संदेश अख्या जगात पोहचल्याचं चित्र पाहायला मिळालं. भारत-चीन सीमेवरील संघर्ष आणखी टोकाला जाण्याचे संकेत मोदींच्या या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे.

यापूर्वी भारत-चीन यांच्यातील संघर्ष हे स्थानिक पातळीवर व्हायचे परंतु मोदींच्या भेटीमुळे आता हा संघर्ष आता दोन देशांमध्ये सुरु झाल्याचं स्पष्ट होतं. तसेच चीनचे ५९ अॅप देखील भारतात बंद करण्यात आले आहे. या संघर्षात आशिया खंडातील अनेक छोटे देश भारतासोबत चीन समोर उभे आहेत. त्यामुळे एकटा भारत चीनच्या कुरघोड्यांना आता गंभीरपणाने आव्हानं देऊन त्यांचा सामना करु शकतो. एकंदरित पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यातून आणखी काय स्पष्ट होत आहे सांगतायेत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद देवळाणकर पाहा हा व्हिडिओ.

Full View

Similar News