Ground Report : समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

Update: 2022-05-27 15:32 GMT

मालवणच्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरील बोट दुर्घटनेनंतर समुद्र किनारे व समुद्रातील सफरीच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तृत, अथांग व मनमोहक किनारा लाभलाय. या किनारपट्टीवर व समुद्रात मनसोक्त मौजमस्ती करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा मात्र सध्या रामभरोसे झालीय. रायगड जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यावर व समुद्रात पर्यटक बुडून व बोट दुर्घटनेत मृत्यू होणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीय. शिवाय पर्यटकांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उन्हाळी सुट्टीत पर्यटक मोठ्या संख्येने समुद्र किनाऱ्यावर दाखल होतात. या पार्श्वभूमीवर समुद्रात बोटींवर लक्ष ठेवण्यासाठीची आपत्कालीन यंत्रणा देखील सजग व तत्पर असली पाहिजेत अशी मागणी होतेय. बुडणाऱ्या पर्यटकांना जीवावर उदार होऊन वाचवणारे जीवरक्षकच सुरक्षित आहेत का?शासनाकडून मिळणारी साधनसामुग्री अद्यय्यावत व पुरेशी आहे का? पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी, यावर जीवरक्षक प्रशिक्षक, जीवरक्षक यांच्याशी आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी खास बातचीत केलीय.

Full View

Tags:    

Similar News