पालघर: प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची वरिष्ठांविरोधात रॅगिंगची तक्रार

Update: 2019-11-16 13:28 GMT

पालघर शहरातील एम एल ढवळे ट्रस्टच्या रूग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरसोबत रॅगिंगचा प्रकार घडल्याची तक्रार पालघर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात मानसिक छळ केल्याप्रकरणी 15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात रॅगिंग प्रतिबंध कायदा अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पंधरा वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करीत असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

पालघर शहरात बोईसर राज्य महामार्गाजवळ एम. एल. ढवळे ट्रस्टचं हे रुग्णालय आहे. ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर ढवळे रुग्णालयात आपले शिक्षण पूर्ण करून प्रशिक्षण अनुभव घेण्यासाठी दोन तीन दिवसाअगोदर येथे रुजू झाली होती. डॉक्टर महिला पालघरच्या ढवळे रुग्णालयात दोन ते तीन दिवसांपूर्वी रुजू झाली होती. प्रशिक्षणासाठी आलेल्या या महिलेची वरिष्ठ डॉक्टरांशी ओळख करून देण्यात येत होती. त्याचवेळी त्यांनी मानसिक छळ केला. यामुळे तिला मानसिक इजा पोहोचली असं तिने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे ढवळे रुग्णालय आता या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. रुग्णांना सेवा देण्यासाठी रुजू झालेल्या अशा प्रशिक्षणार्थ्यांबरोबर हे वरिष्ठ डॉक्टर असा छळ करीत असतील तर या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर यांच्या विरोधात पोलीस कोणती भूमिका घेतात? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Full View

Similar News