VIDEO : कांद्याचे भाव पडणार का?

Update: 2019-09-30 13:02 GMT

सध्या कांद्याचा भाव ४० रूपये प्रति किलो झाला आहे. काही ठिकाणी ५० ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत कांद्याचे भाव गेले आहेत. यामुळे दोन हजार टन किलो कांदा आयात करण्याचं टेंडर मोदी सरकारने काढलं आहे. या संदर्भात आम्ही शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी मोदी सरकार मागील सरकार प्रमाणेच धोरणं राबवत असल्याचं म्हटलं आहे.

आपण जगभरातून स्वस्त कांदा आयात करण्याचा प्रयत्न करत आहोत. कांद्याचा भाव वाढल्या बरोबर मोदी सरकारने जे काम केलं आहे. तेच काम काँग्रेस सरकारही करत होतं. कॉंग्रेस सरकारही कमीत कमी निर्यात किंमत जाहीर करायची परदेशातून विमानातून, जहाजातून कांदा आयात करायची. तीच पद्धत सध्या भाजपच्या मोदी सरकारने अवलंबली आहे.

मग 70 वर्ष काँग्रेस सरकारचं पाप म्हणणारे भाजपचं सरकार सुद्धा तेच करत असेल तर सरकार बदललं पण धोरण कुठे बदललंय? तेच सुरु आहे. शेतकऱ्यांची लूट करण्याचं तीच धोरणं ही सरकार सुद्धा राबवत आहेत.

मोदी सरकारकडून लोकांना एक नवीन अपेक्षा होती. लाल बहादूर शास्त्रींप्रमाणे कांदा खाणाऱ्या श्रीमंत लोकांना आवाहन करतील की दोन महिने कांदा खाऊ नका, व सोमवारी उपास करा. अन्नधान्यांची बचत करण्यासाठी मोदींनी असं आवाहन करण्याची अपेक्षा जावंधिया यांनी व्यक्त केली. मात्र, मोदींनी तसं न करता कमीत कमी निर्यात किंमत वाढविली आणि कांदा आयात करणं सुलभ केलं. त्यामुळं जावंधिया यांनी सरकार बदलतंय पण धोरण तीच असल्याचं स्पष्ट केलं.

सरकारने शेतकऱ्यांना मारून उपभोगत्यांना निवडणुकीमध्ये खुश करण्याकरिता शहरी मतदारांना आकृश करण्याकरिता हा निर्णय घेतलेला असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यावेळी पण शेतकऱ्यांच मरण अटळ आहे. कांद्याचे भाव पडतील तरी सरकार ताबडतोब शेतकऱ्यांच्या मदतीला येणार नाही.

काय आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची स्थिती, भारतात किती कांदा सरकार आयात करणार? कांद्याचे भाव वाढणार की कमी होणार पाहा शेतकरी नेते विजय जावंधिया यांचे विश्लेषण

Similar News