Elon musk : विरोधानंतर एलन मस्क यांचे एक पाऊल मागे

Update: 2022-11-01 14:27 GMT


गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली ट्विटरची डील पुर्ण झाली आणि एलन मस्क ट्वीटरचे नवे मालक बनले. एलन मस्क यांनी ट्वीटर ताब्यात घेताच ब्लू टिक असलेल्या वापरकर्त्यांसाठी धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्लू टिकवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

एलन मस्क (Elon musk) यांनी ब्लू टिकसाठी दर महिन्याला 20 डॉलर (20$) मोजावे लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यावरून सोशल ट्वीटरवर एलन मस्क (#Elonmusk) आणि ट्विटर ब्लू टिक ट्रेंड (#twitterbluetick) होत आहे. अनेक ब्लू टिक असलेल्या सेलिब्रिटींनी आम्ही पैसे देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यातच ब्लू टिक असलेल्या श्वेता नेगी (Shweta Negi) म्हणाल्या की, अनेक लोकांनी आपण प्रत्येक महिन्याला ब्लू टिकसाठी पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले आहे.

एलन मस्क यांनी ब्लू टिकसाठी पैसे अकारणार असल्याचे म्हटल्याने प्रियंवदा गोपाल (Priyamvada Gopal) म्हणाल्या की, कायदेशीर संरक्षणासाठी पैसे मोजावे लागणे हे आश्चर्यकारक आहे. मात्र अरुण बोथरा (Arun bothara) यांनी मस्क यांना टॅग करत हा ट्विटरच्या लोकशाही (democracy)करणाचा प्रवास असल्याचे म्हटले आहे.

एकीकडे मस्क यांच्या निर्णयाचा विरोध केला जात असताना फरीद खान (Farid khan) यांनी मात्र ब्लू टिकसाठी पैसे मोजण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान एलन मस्क यांच्या निर्णयानंतर जगभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. ट्विटरसाठी पैसे मोजण्यास लोकांचा विरोध असल्याचे समोर आल्यानंतर एलन मस्क यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. एलन मस्क यांनी स्टिफन किंग (stephan king) यांच्या ट्वीटला रिप्लाय देतांना म्हटले आहे की, आम्हाला अनेक बील देण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. ट्विटर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती घेत नाही. त्यामुळे 8 डॉलरचा पर्याय कसा वाटत आहे, असं विचारले आहे. त्यामुळे मस्क यांनी एक पाऊल मागे घेतले असले तरीसुध्दा ब्लू टिकसाठी पैसे मोजावेच लागतील हे स्पष्ट झालं आहे.


Full View

Tags:    

Similar News