एकात्मतेसाठी सोलापूरचे चांदभाई सायकलवरुन निघाले अजमेरला

Update: 2022-05-23 11:22 GMT

देशात दिवसेंदिवस धार्मिक तणावाचं वातावरण वाढत चालले आहे. या परिस्थितीमध्ये देशात पुन्हा नव्याने शांती आणि एकात्मता प्रस्थापित व्हावी यासाठी सोलापुरातील मजरेवाडीचे चांदभाई मुजावर हे अजमेरला निघाले आहेत. सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्यापर्यंत चांदभाई हे सायकलवरून जाणाक आहेत. हजरत ख्वाजा मोईनोद्दीन चिस्ती यांच्याकडे देशातील परिस्थिती सुस्तितीत यावी यासाठी चांदभाईंनी मन्नत मागितली आहे. सोलापूर ते अजमेर हा 1189 किमीचा प्रवास आहे. हा प्रवास 15 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. चांदभाईंनी सुरु केलेल्या या सायकल मोहिमेचे सोलापुरातील सर्व जातीधर्मांच्या नागरिकांनी समर्थन केले आहे.

Full View
Tags:    

Similar News