#ShivajiMaharaj : शिवाजी कोण होता? पुस्तकाच्या ५ लाख प्रतींचे वाटप

Update: 2022-02-19 01:15 GMT

संपूर्ण जगभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंती केवळ मिरवणुका, भगवे कपडे परिधान करणे एवढ्यापुरती मर्यादित नसून महाराजांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्यात वैचारिक पातळीवर जयंती साजरी केली जावी, अशीही अपेक्षा असते. आज सर्वत्र शिवजयंती साजरी होत असताना छात्रभारती संघटनेने अनोखा उपक्रम राबवला आहे. डॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या पाच लाख प्रति राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा या संघटनेचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांची वैचारिक पार्श्वभूमी रुजावी हा या पाठीमागचा उद्देश आहे, असे मत छात्रभारती च्या राज्य संघटक छाया काविरे यांनी व्यक्त केले. शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.


Full View

Tags:    

Similar News