सांगलीत मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरून साखर

Update: 2017-03-10 11:51 GMT

म्हैसाळमधल्या स्त्रीभ्रुण हत्येनं चर्चेत आलेला सांगली जिल्हा पुन्हा एकदा स्त्रीभ्रूणामुळेच चर्चेच आला आहे. यंदाचं कारण मात्र आनंदाचं आहे. वाळवा तालुक्यातील बागणी गावामध्ये दोन कुटुंबांनी मुलगी जन्माला आल्याचा आनंद हत्तीवरून साखर आणि पेढे वाटत साजरा केला. या अनोख्या पद्धतीने स्त्री जन्माचे स्वागत करत समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

कदम आणि सुखटणकर कुटुंबियांनी एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवेल अश्या पद्धतीने आपल्या घरी जन्मलेल्या मुलीचं स्वागत केलं आहे. मुलगी जन्माचे या अनोख्या स्वागत सोहळ्याची संपूर्ण पंचक्रोशीत जोरदार चर्चा होत आहे. या उपक्रमामुळे मुलींची गर्भातच हत्या करणाऱ्या नराधमांना चपराक बसली असून या निमित्ताने दोन्ही कुटुंबीयांनी मुली वाचवा असा संदेश दिला आहे.

Similar News