सदाभाऊंवर किटकनाशकाची फवारणी

Update: 2017-10-04 09:18 GMT

यवतमाळ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला आहे. यवतमाळ येथे गेल्या काही दिवसात किटकनाशकाने १९ शेतक-यांचा बळी गेला आहे. तसचं ५०० हून अधिक शेतकरी विषबाधीत झाले आहेत अशा विषबाधीत शेतक-यांना भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सिकंदर शहा या शेतक-याने लिक्विड फवारणीचा प्रयत्न केला आहे. दरम्यान सदाभाऊंना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकऱणी पोलिसांनी सिकंदर शहा या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

Similar News