'संप मिटत नसेल तर मी काय करू' ?- दिवाकर रावते

Update: 2017-10-17 16:24 GMT

राज्यात सध्या एसटी कर्मचा-यांचा विविध मागण्यासाठी संप सुरू आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची एका व्यक्तीशी बातचित केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमधील व्यक्ती आपण मंत्री आहात, आपण संप मिटावा म्हणून प्रयत्न करा अशी विनंती करत आहे. तर यावर दिवाकर रावते यांनी संतप्त होऊन, संप मिटत नसेल तर मी काय करू? असा सवाल फोनवरील व्यक्तीला केला आहे.

दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर आम्ही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Full View

Similar News