राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा

Update: 2017-08-28 10:17 GMT

बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीमला कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. डेरा सच्चा सौदामधील साध्वीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात बाबा दोषी ठरला होता. रोहतक जेलमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती जयदीप सिंग यांनी बाबाला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सुनावणी सुरू झाल्यानंतर बाबाच्या वकिलांनी बाबाच्या सामाजिक कामांचा दाखला देत शिक्षेत माफी देण्याची मागणी केली. मात्र सीबीआयच्या वकिलांनी कठोरात कठोर शिक्षेची मागणी कोर्टाकडे केली. यावर कोर्टाने माफीची मागणी अमान्य करत बाबाला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Similar News