राज्यात आता चारायुक्त शिवार योजना

Update: 2017-07-13 14:52 GMT

राज्य सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेनंतर आता चारायुक्त शिवार योजना राबवण्यात येणार आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मांडलेल्या या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या योजनेंतर्गत राज्यभरातील पडीक जमिनीवर जनावरांसाठी चारा निर्माण करण्यात येणार असून दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांवर करण्यात येणाऱ्या खर्चाला कात्री लावण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच मत्स्ययुक्त तलाव ही योजनाही राबवण्यात येणार असून या माध्यमातून मत्स्य उत्पादन वाढवण्याचा म्हणजे तलाव तेथे मासळी हा नविन उपक्रमही राबवण्यात येणार असून या योजनेलाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून या दोन्ही योजना महादेव जानकर यांच्या देखरेखीकाली राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील गाळ काढण्यात आलेल्या तसेच अद्याप मत्स्य उत्पादन घेतले जात नाही अशा सर्वच तलावांवर ही योजना राबवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Similar News