मुंबईकरांनो उद्या काळा सोमवार पाळणार ना?

Update: 2017-10-01 06:51 GMT

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर गप्प बसायचं नाही असं आता मुंबईकरांनी ठरवलं आहे. रेल्वेचा हलगर्जीपणा या दुर्घटनेला जबाबदार आहे हे स्पष्टच असल्यानं रेल्वे आणि सरकारबाबत मुंबईकरांमध्ये संतापाची लाट आहे. भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबईकरांनी एकत्र येण्याचं आवाहन करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोमवारी म्हणजे २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी 'काळा सोमवार' पाळण्याचं आवाहन या मेसेजमधून करण्यात आलं आहे. असा आहे तो संपूर्ण मेसेज.....

मुंबईकरांनो ही श्रद्धांजली वाहणार का?

आज एल्फिस्टन रोड स्टेशनला डझनभर रेल्वे प्रवासी किडा मुंगीसारखे मारले गेले, आपण त्यात समाविष्ट नव्हतात म्हणून देवाचे आभार मानत हा मेसेज वाचत आहात.

करोडो रुपये उधळून आवश्यकता नसताना मुंबई - अहमदाबाद (मुंबई दिल्ली पण नाही) बुलेट ट्रेनचा राजहट्ट एकीकडे आणि दुसरीकडे रोज ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणारे लाखो पुरुष व महिला प्रवासी.

मित्रांनो, तुमची कोणालाच पडलेली नाही. अशावेळी बुलेट ट्रेनने ढगात प्रवास करणाऱ्या राज्यकर्त्यांना जमीनपर आणायची वेळ झाली आहे.

चला आपण सगळे *शांतपणे* आवाज उठवूया।

सोमवारी बरीच कार्यालये सुरू आहेत वा नसतीलही. या मृत प्रवाश्यांना श्रद्धांजली म्हणून सोमवारी महात्मा गांधी जयंती दिनी गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करूया.

दसऱ्याचे ९ दिवस नवरंग साड्यांची कल्पना महिलावर्गाने राबवली.

*तसाच हा सोमवार - काळा रंग*

*झोपलेल्या सरकारला श्रद्धांजली।*

*सर्व पुरुष-महिला, सर्व जातीधर्माच्या मुंबईकरांना जाहीर आवाहन।*

*एल्फिन्स्टन रोड रेल्वे दुर्घटना मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 ऑक्टोबर - काळा सोमवार पाळूया*।

झोपलेल्या सरकारचा निषेध म्हणून रेल्वेचा प्रत्येक प्रवासी सोमवारी काळ्या रंगात रंगेल

आणि गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने शांतपणे आपला राग व आक्रोश व्यक्त करेल.

दोन दिवसात संकल्प करा व हा मेसेज होऊ दे मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, विरार, डहाणू पर्यंत व्हायरल...*

बंधू-भगिनींनो, हे कराल ना?

Similar News